Description
मेसापोटेमिया, चीन, रोम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका आणि भारत या देशांमधल्या तसंच मुस्लिम कायद्यांचा चित्तथरारक इतिहास. याशिवाय सर्वसामान्यांना माहीत हवे असे भारतीय कायदे या सगळ्यांची माहिती देणारं पुस्तक म्हणजे ‘माय लॉर्ड’.
‘न्यायसंस्थेचा विकास कसा झाला या संदर्भातले हे पुस्तक अच्युत गोडबोले यांनी आपल्या नेहमीच्या भरगच्च, मात्र साधार माहिती पुरवण्याच्या शैलीनं लिहिलं आहे व त्याला सहलेखक माधुरी काजवे यांनी योग्य साथ दिलेली आहे.’