Skip to product information
1 of 2

स्वातंत्र्यवीर सावरकर By धनंजय कीर

स्वातंत्र्यवीर सावरकर By धनंजय कीर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतातील एक अभिजात क्रांतिकारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यसमरातील त्यांचे महान कार्य व त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवर्तक आंदोलन हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक अविस्मरणीय...

Regular price Rs. 800.00
Sale price Rs. 800.00 Regular price Rs. 875.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 800.00
View full details

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतातील एक अभिजात क्रांतिकारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी नेते होते. भारतीय स्वातंत्र्यसमरातील त्यांचे महान कार्य व त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवर्तक आंदोलन हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक अविस्मरणीय पर्वच ठरले आहे.

धनंजय कीरांनी लिहिलेले हे चरित्र म्हणजे सावरकरांच्या तुफानी, स्फोटक आणि स्फूर्तिदायक जीवनाचे एक असाधारण, समग्र, सर्वांगीण व समतोल असे चित्रण आहे. चरित्रातील माहिती अद्ययावत असून त्यात स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर सत्यानिष्ठेने प्रकाश टाकण्यात आला आहे.

या ग्रंथाच्या पहिल्या इंग्रजी आवृत्तीच्या हस्तलिखितास सावरकरांच्या अवलोकनाचा अलभ्य लाभ झालेला होता. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी स्वातंत्र्यवीरांनी काही महत्त्वाचे मूळ कागदपत्र, पुरावे व पत्रव्यवहार कीरांना उपलब्ध करून दिला होता. आवश्यक तिथे त्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली होती.

आधुनिक भारतातील विविध विचारप्रवाहांचा नि घटनांचा साखोल अभ्यास करावा असे ज्या राजकारणी, समाजकारणी, धर्मकारणी विचारवंतांना वाटते, त्यांनी हा ग्रंथ अवश्य वाचवा.