Description
‘मातापित्यांची शिकवण मनात खोलवर रुजली असली पाहिजे. ती आता वर आली. मी हे आव्हान नाकारूच शकत नव्हतो. भले त्यासाठी मला माझा प्राण गमवावा लागला तरी हरकत नाही! आव्हान मिळूनही मी भ्याडासारखा कातडी बचावण्यासाठी चार भिंतीमागे लपून बसलो असतो तर? तर प्राण वाचवला असता; पण बाकी सर्व गमावलं असतं! जगात उजळ माथ्याने वावरणं अशक्य झालं असतं. किड्यामुंगीसारखं सांदीकोपऱ्यात लपून राहावं लागलं असतं. आज माझा सन्मान करणारे तुम्ही तुम्हीच माझी छी: थू! केली असती. ‘मी गेलो आणि आवश्यक ते सर्व केलं. दैवाची साथ मिळाली असं समजा. दैव शूराचीच सोबत करतं. मी माझ्या कार्यात यशस्वी झालो. गायत्रीदेवी सुखरूप परत आल्या आणि म्हणून आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आनंदाने आलो. आपले सर्वांचे आभार.’ कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट चालला होता.
(प्रस्तुत पुस्तकातून…)