Skip to product information
1 of 1

Balidan | बलिदान By Swapnil Pandey

Balidan | बलिदान By Swapnil Pandey

इंडियन पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांएवढे धैर्यवान आणि साहसी लोक क्वचितच पाहायला मिळतील आणि तरीही त्यांची नावं कधीही प्रकाशात येत नाहीत. ‘बलिदान’ बॅजच्या अत्यंत पात्र हक्कदारांवर अत्युच्च पर्वतराशीवरील सीमारेषाचं संरक्षण आणि...

Regular price Rs. 275.00
Sale price Rs. 275.00 Regular price Rs. 299.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 275.00
View full details

इंडियन पॅरा स्पेशल फोर्सेसच्या जवानांएवढे धैर्यवान आणि साहसी लोक क्वचितच पाहायला मिळतील आणि तरीही त्यांची नावं कधीही प्रकाशात येत नाहीत. ‘बलिदान’ बॅजच्या अत्यंत पात्र हक्कदारांवर अत्युच्च पर्वतराशीवरील सीमारेषाचं संरक्षण आणि भयानक दहशतवादाचं उच्चाटन या पराकोटीच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. या शूर योद्ध्यांभोवती एक गूढ वलय आहे. त्यांच्याविषयी असंख्य आख्यायिका आहेत. त्यांच्या मोहिमांविषयी एवढी गुप्तता पाळली जाते की डॅगर, घोस्ट, व्हायपर आणि डेझर्ट स्कॉर्पियो अशासारख्या सांकेतिक नावांव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अफाट आणि असीम साहसकथांच्या या लक्षणीय संग्रहामध्ये स्वप्निल पांडेंनी काही महान स्पेशल फोर्सेस अधिकाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला आहे. कर्नल संतोष महाडिक, कॅप्टन तुषार महाजन, ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत, सुभेदार मेजर महेंद्र सिंग आणि इतर काही साहसवीरांचा वाचकांशी परिचय करून दिला आहे. एक वर्षाच्या कालावधीत या सैनिकांच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या दोनशेपेक्षाही अधिक मुलाखती, LOC आणि LAC जवळच्या विविध स्पेशल फोर्सेस युनिटला दिलेल्या अनेक भेटींवर हे पुस्तक आधारित आहे. या अनाम, अप्रसिद्ध सैनिकांना गूढ वलयातून बाहेर काढून लोकांसमोर आणायचं हे ‘बलिदान’ लिहिण्यामागील उद्दिष्ट आहे.