Description
एक भाकर तीन चुली संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे. गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, या कादंबरीत अनुभवता येईल. नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत, ज्या स्त्रियांंच्या वाट्याला संघर्ष आला, तरीही ती न हारता न डगमगता लढत राहिली अशा जगातल्या सगळ्याच स्त्रियांना ही कादंबरी समर्पित..