Skip to product information
1 of 1

Potali - पोटली by अंजली शैलेश

Potali - पोटली by अंजली शैलेश

NRI गल्फी गंध- जोडती सोळा वर्षांनी मायदेशी बंध. या पोटलीत! (पोतडीत)...साल 2000 ते 2016 ह्या कलावधीतील गल्फी लाईफच्या स्वानुभव आठवणींची रेखाचित्रे, किस्से, पंचवीस देशांच्या सफरीचे भटकंती चित्र सापडेल. हे अनुभव...

Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 225.00
View full details

NRI गल्फी गंध- जोडती सोळा वर्षांनी मायदेशी बंध. या पोटलीत! (पोतडीत)...साल 2000 ते 2016 ह्या कलावधीतील गल्फी लाईफच्या स्वानुभव आठवणींची रेखाचित्रे, किस्से, पंचवीस देशांच्या सफरीचे भटकंती चित्र सापडेल. हे अनुभव कधी आखाताच्या वास्तवाचे सत्य समजून घेण्यास तर कधी परदेशातील नुसत्याच भुलवणाऱ्या वैभवाच्या आहारी न जाता आयुष्याचे ध्येय गाठण्यास मार्गदर्शक ठरतील.

त्यानुसार प्रयत्नांची दिशा ठरवत आवश्यक तेवढं बचतीचं उद्दिष्ट गाठून, सगळ्या आघाड्यांवर यशस्वी ठरत, एका आनंदी आयुष्याचा आयाम उलगडत जाईल.
परदेशी वास्तव्य त्यातील सुखांपलीकडील धोके आणि भारतात सुखेनैव परतीची वाट चोखंदळयासाठी हे अनुभवकथन जणू वस्तुपाठ बनू शकते. पैसे कमवणे, गमवणे,
कधी यश, अपयश ह्या ऊनपावसाच्या खेळात तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावरील इंद्रधनुष्य सप्तरंगी होण्यासाठी वयाच्या चाळिशीनंतर विचारांची दिशा महत्त्वाची ठरते.

शैलेशची अमूल्य साथ आणि जगप्रसिद्ध लोकांच्या अतिशय उत्तमोत्तम मुलाखती घेण्याचा जागतिक विक्रम केलेले सुप्रसिद्ध मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळेच ही गल्फी सेल्फी रेखीव होऊ शकली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.पुस्तकाला हे रंगरूप येण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहाय्य मिळालं त्या सुलभा तेरणीकर व मंगला गोडबोले तसेच हे पुस्तक आपल्यापर्यंत आणणाऱ्या बुकगंगा पब्लिकेशन्सचे मंदार जोगळेकर व सुप्रिया लिमये यांचे विशेष आभार.