Description
वि. स. खांडेकर जसे कादंबरीकार होते, कथाकार होते तसेच लघुनिबंधलेखकही होते. १९२७ पासून १९७६ पर्यंत त्यांनी २७७ लघुनिबंध लिहिलेले आहेत. त्यातील असंग्रहीत रहिलेल्यातील पंधरा लघुनिबंधांचा हा संग्रह. विषय वैचित्र्याबरोबरच त्यातील गंभीर तत्त्वचिंतनामुळे अंतर्मुख करायला लावणारा. विषय कितीही साधा असो त्यातून गहिरे जीवनमूल्य समजावणे-तेही सहज- हे तर खांडेकरांचे वैशिष्ट्य.
'अजून येतो वास फुलांना’ लघुनिबंध तर मानसिक ताना-बानांचाच आहे, अर्ध भांडं पाणी म्हणजे तर महात्मा गांधींच्या काटकसरीचाच धडा समजाविणारा लघुनिबंध आहे, अलंकारप्रिय खांडेकर 'एक होता वाघ’ मध्ये डोकावलेले आहेत तर 'एक चुटका’ लघुनिबंधाचे विचारसूत्र आहे. 'देश तशी माणसं’ इसापनीती-रामायणाची विचार करायला लावणारी उकल त्यांनी 'दोन पुस्तके’ मध्ये केली आहे तर 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा’त त्यांना परिवर्तनाची बीजे पेरणारा ज्ञानेश्वर दिसलेला आहे. 'जीवननाट्य’ जीवनरहस्याचा धाडोंळा देणारा लघनिबंध तर 'न-नाटकाच्या नाविका’ अश्या वेगळ्या शीर्षकाचा लघुनिबंध माणसाच्या पूर्णत्वाचा शोध घेणारा.
डॉ. सुनीलकुमार लवटे संपादित हा वि. स. खांडेकर ह्यांचा लघुनिबंध संग्रह त्यांच्या लेखनशैलीबरोबरच विचारशैलीही प्रगट करणारा संग्रह आहे.

