Skip to product information
1 of 1

आले मेघ भरून /Ale Megh Bharun BY Mangesh Padgaonkar

आले मेघ भरून /Ale Megh Bharun BY Mangesh Padgaonkar

मंगेश पाडगावकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व. कवितेबरोबरच त्यांच्या गद्यलेखनाचा मागोवा घेत असताना त्यांनी विविध प्रकारचे गद्यलेखन केले आहे, असे आढळून आले. आणि त्यातूनच ‘आले मेघ भरून’ या असंग्रहित लघुनिबंधांचे संकलन झाले....

Regular price Rs. 140.00
Sale price Rs. 140.00 Regular price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 140.00
View full details

मंगेश पाडगावकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व. कवितेबरोबरच त्यांच्या गद्यलेखनाचा मागोवा घेत असताना त्यांनी विविध प्रकारचे गद्यलेखन केले आहे, असे आढळून आले. आणि त्यातूनच ‘आले मेघ भरून’ या असंग्रहित लघुनिबंधांचे संकलन झाले. या संग्रहात काही आत्मपर अनुभव आहेत, काही बालपणीच्या आठवणी आहेत, काही लेख व्यक्तिचित्रांच्या अंगाने जाणारे तर काही प्रवासातल्या आठवणी कथन करणारे आहेत. अतिशय काव्यमय शैलीत निसर्गाचे वर्णन करणारे लघुनिबंध जणू गद्य कविताच आहेत. केवळ काव्योत्कट भाषेचे सौंदर्य एवढेच या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य नाही तर भोवतालच्या समाजाकडे, माणसांकडे डोळसपणे पाहताना आलेले काही विलक्षण अनुभवही त्यांनी या ललितबंधातून मांडले आहेत.

तन्मयतेने एकेक अनुभव उलगडणारे हे लघुनिबंध वाचताना कथा आणि लघुनिबंधामधील सीमारेषा धूसर झाल्याचे जाणवते. वाचकांना विविधांगी अनुभव देणारे हे लघुनिबंध कविवर्य मंगेश पाडगांवकर या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू दाखवणारे आहेत.