Description
या पुस्तकात काही कॅन्सरयोद्ध्यांचे अनुभव शब्दांकित केले आहेत, ज्यांनी कॅन्सर जवळून पाहिला, जे त्याच्याशी लढले, ज्यांनी त्याच्यावर मात केली आणि आज जे एक समाधानी जीवन जगत आहेत.
आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, डॉक्टर, परिचारिका आपल्या उपचारादरम्यान सोबत असतात. या सर्वांची साथ आपल्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची असतेच; तसंच या वाटेवर आपल्या सहवेदना जाणणाऱ्याने आपल्या जखमेवर घातलेली एक फुंकर आपल्याला जगण्याची नवी उमेद देते.
उमेद... जी म्हणते, मला लढायचं आहे, कॅन्सरला हरवायचं आहे. मग सुरू होतो शोध, आपल्या नवीन अस्तित्वाचा. कृतज्ञतापूर्वक स्वीकारलेलं हे नवं अस्तित्व संवेदनशील आणि अतिशय सकारात्मक असतं. जीवन आणि मृत्यूमधली पुसटशी रेषा अनुभवलेलं असतं. भूतकाळातले सगळे हिशोब संपवून क्षमाशील झालेलं असतं. भविष्याची चिंता न करता वर्तमानात आनंदाने कसं जगावं, याकडे लक्ष देणारं असतं. म्हणूनच ते खूप जास्त आश्वासक असतं... इथूनच, या नवीन अस्तित्वाचा सुरू होतो, एक नवा प्रवास...
जगणं नव्याने जगताना...