Description
सध्या जगात आणि भारतातही नवउदारमतवादाचे
युग अवतरले आहे. याचे खाजगीकरण,
उदारीकरण आणि जागतिकीकरण असेही वर्णन
केले जाते. माझ्या मताने हे शब्दप्रयोग फसवे
आहेत. ‘उदारीकरण’ म्हटले की, त्यात काही तरी
चांगले आहे, असा भास निर्माण होतो. या नव्या
जागतिक प्रवाहामध्ये चांगले काहीही नाही.
हे निव्वळ भांडवलाने आणलेल्या निर्लज्ज नफेखोर
नशेचे युग आहे. कुठल्याही मार्गाने नफा
मिळवला; तर तो योग्यच आहे, अशी शिकवण
अप्रत्यक्षपणे मिळत आहे. परिणाम म्हणून जगभर
खोट्या, बनावट, आरोग्याला हानिकारक अशा
पदार्थांची निर्मिती आणि विक्रीचं प्रमाण वाढते
आहे. एका अंदाजानुसार जगात एकूण बनावट,
खोटा, आरोग्याला हानिकारक माल बनवण्याचा
काळा धंदा हा आता १.५ ट्रिलिअन डॉलर इतका
व्यापक झाला आहे आणि इतर कुठल्याही
उद्योगाच्या तुलनेत तो जास्त वेगाने वाढतो आहे.