Description
मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची ‘ब्लॅक सप्टेंबर’ संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी ‘येलोकेक’ युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.