Description
अध्यात्माचे मूळ हिमालयात असल्याने अनेक योगी, साधू तेथे तपश्चर्येसाठी जातात. तत्वचिंतक असलेले पॉल ब्रन्टन यांनी 'स्व'चा अर्थ शोधण्यासाठी युरोपातून भारताचा रस्ता धरला. अख्खा भारत फिरून झाल्यावर ते हिमालयाच्या सान्निध्यात आले. तिबेट ते कैलास पर्वत अशा प्रवासात त्यांना वेगळी अनुभूती मिळाली. सत्व गळून पडणारे अध्यात्मिक अनुभव त्यांनी घेतले.
आंधळेपणाने ते न स्वीकारता विज्ञानाच्या चष्म्यातून त्याकडे पाहिले. हे सर्व त्यांनी पुस्तकातून वाचकांपुढे मांडले आहे. त्याचा मराठी अनुवाद गणेश निळकंठ पुरंदरे यांनी 'हिमालय नि एक तपस्वी' या द्वारे केला आहे. हिमालयाचे सुंदर प्रवास वर्णन, अध्यात्मिक अनुभव यातून वाचायला मिळतात. एका परदेशी लेखकाने पौर्वात्य तत्वज्ञानाचे केलेले विश्लेषण आत्मशांततेबरोबरच भौतिक आयुष्यातील चढ-उताराला सामोरे जाण्याचे बळ देते.

