Description
'आर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे. ते कोण होते, कोठून आले आणि त्यांचा काळ याबद्दल विद्वानांत प्रचंड वाद आहे, परंतु त्याची समाधानकारक उकल अद्याप झालेली नाही. असे असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय उपखंडात जी पुरातत्त्वीय उत्खनने झाली आहेत, त्यांच्या पुराव्यावरून दिसून येते की, सुमारे सात हजार वर्षांपूर्वी काही नवे लोक भारतात आले आणि सांस्कृतिक विकास सुरु झाला. सिंधुच्या खो-यातून ते सरस्वतीच्या खो-यात स्थिरावले. तेथे सिंधु संस्कृती उदयास आली. परंतु चार हजार वर्षांपूर्वी पर्यावरणातील प्रतिवूâल बदलामुळे तिचा -हास सुरू झाला. ही उत्तरसिंधु संस्कृती वैदिक आर्यांची असावी, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे. हे पुस्तक आहे त्याचीच विस्तृत चर्चा.