Description
'मी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर दाटतो, डोळ्यांत पाणी साचते. या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार करणे, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट. जगात असा दुसरा देव नाही!