Description
कर्तृत्वादाखल ज्यांचं नावही पुरेसं असतं अशा काही व्यक्तींच्या यादीत आपलं ध्रुवपद सर्वकाळ अढळपणे राखणारं नाव म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाइन!
शाळेतील एक तथाकथित सामान्य विद्यार्थी ते विज्ञानात अजोड योगदान देणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ असा त्यांचा जीवनप्रवास अत्यंत रोचक आहे. त्यांनी आपल्या कार्याद्वारे विज्ञान क्षेत्रात संशोधन करू पाहणार्या असंख्य नव्या संशोधकांसाठी भक्कम पाया तयार केला.
विज्ञानानं मानवी जीवनाला उन्नत करण्याचा उदात्त दृष्टिकोन ठेवावा असं आइन्स्टाइन म्हणत. सुखानं नांदणारं शांतताप्रिय जग या संकल्पनेवर त्यांचा ठाम विेशास होता.
अशा या महान शास्त्रज्ञाची जडणघडण, कौटुंबिक जीवन, संघर्षयात्रा, दुसर्या महायुद्धाचे त्यांनी सोसलेले परिणाम यावर हे पुस्तक प्रकाश टाकतं. तसेच त्यांचं भगीरथ कार्य, मानवतावादी दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव यांची मनोज्ञ सफर घडवतं.