Description
विज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात, विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली. विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एक संहारक अस्त्रांची निर्मिती! या अस्त्रांच्या अविवेकी वापराने मानवजातीचं अस्तित्वच धोक्यात आलं. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या मानवजातीच्या वाट्याला, उंबरठा ओलांडल्यावर काय होणार आहे? तिचा वारसा कोणता? तिच्या स्वागताला कोण असणार आहे? तिसरं महायुध्द, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की, पेनिसिलीनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी यांच्यासारखे महात्मे? उपासमार की देवदुर्लभ समृध्दी? वि.गो.कुलकर्णी यांनी आपल्या चिंतनपर लेखनातून विसाव्या शतकातील विज्ञानाच्या प्रगतीचं, त्याच्या दुष्परिणामांचं विश्लेषण केलं आहे. त्याचबरोबर एकविसाव्या शतकाचं संभाव्य चित्रं रेखाटलं आहे.