Description
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्व प्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकुम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमीतपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले ते सुंग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतू हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजूम एक पाऊल गेले आहे.