Description
'लोकांना कलावंतांना भेटण्याची, बघण्याची जाम क्रेझ. आणि दुसरी क्रेझ? स्वत: टीव्हीवर, पडद्यावर झळकायची. मग रिअँलिटी शोज पॉप्युलर होतात. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी टीम जमा होतात. पैशाचे पाणी अन् प्रसिध्दीचे वारे वाहतात. पण या पैसा अन् प्रसिध्दीला भुलून आपण पिढयानपिढयांच्या कलेलाच तोतया ठरवत नाही ना? कलाकाराच्या मोजमापासाठी कलेच्या सोन्याच्या नाण्याऐवजी बाकीच्याच कवडयारेवडयांचा विचार करत नाही ना? आपल्या वेगवेगळया सोंगांतून आजच्या बेगडी आयुष्यावर अन् त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावर झगझगीत झोत टाकणारा'