Description
भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे. पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही. एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे. जेम्स विल्सन, जेरेमी रैसमान, सी. डी. देशमुख, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांच्यासारखे प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे. ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.