Description
एकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण. मुंबई इलाख्यातील धर्मांतरित जोडपे हरीपंत आणि राधाबाई. त्यांची कन्या कृपाबाई. विवाहानंतर कृपाबाई मद्रास प्रांतात राहिल्या. बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले. मुस्लिम शाळाही काढली. 'कमला' या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते. पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका ! रोहिणी तुकदेव यांच्या रसाळ शैलीमुळे सहज सुंदर झालेला हा भावानुवाद ....