Description
गेली सव्वीस वर्षं वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, ग्रामीण भागातील बालकं, पालक आणि स्थानिक समाजापर्यंत बालशिक्षणाचं महत्त्व अनेक मार्गांनी पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामीण महिलांना बालवाड्या चालविण्यासाठी ग्रामीण भागातच शिक्षण उपलब्ध करून देणं. हे पुस्तक प्रामुख्याने ग्रामीण भागातील बालशिक्षण व संभाव्य शिक्षिका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलं आहे. लेखक शिक्षिकांना ग्रामीण शिक्षिका प्रत्यक्ष तयार करण्याचा अनुभव आहे. ग्रामीण महिलांना विषय परिणामकारक पद्धतीनं समजण्यास उपयुक्त असं हे पुस्तक.