Description
'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा दुसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. प्रसारमाध्यमांमध्ये विविध क्षेत्रांसाठी म्हणजेच बीट्ससाठी नेमतात स्वतंत्र बातमीदार. प्रत्येक बीटची रचना, त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्ष बातमीदारी कशी करायची - याचे मौलिक मार्गदर्शन करणारा हा भाग. तो वाचून अगदी नवख्या बातमीदारालाही त्या बीटवर आत्मविश्वारसाने पाऊल टाकता येईल अन् पहिल्या दिवशीही चांगली बातमी मिळवता येईल !