Description
गणित म्हटले की डोळ्यापुढे येतात शून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती, वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी बीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र. पण यातल्या कितीतरी गोष्टी शोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वी आणि त्याही आपल्या भारतात ! आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधव आणि अशा कितीतरी महान गणितज्ञांची भली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित. हे गणित आणि त्यातले सिध्दांत संस्कृत भाषेतच का अडकून पडले? त्याचे आजच्या संगणकयुगाशी काही नाते आहे का? या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारा मौल्यवान ग्रंथ.