Description
नाटककार प्रेमानंद गज्वी हे गेली काही वर्षे सातत्याने बोधी नाटय़ महोत्सव आणि बोधी नाटय़लेखन कार्यशाळा भरवत आहेत. बोधी म्हणजे ज्ञान. हा शब्द त्यांनी बौद्ध वाङ्मयातून घेतला आहे. नाटक या माध्यमातून गज्वी जो ज्ञानविषयक उपक्रम करू पाहत आहेत, तो स्तुत्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे

