Description
देशातील सगळयात महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ\' असा सार्थ लौकिक असणारे वैज्ञानिक म्हणजे सी. एन. आर. राव. परदेशातल्या ख्यातनाम विद्यापीठांतून ज्ञानाचा ठेवा पाठीशी घेऊन राव भारतात परतले, ते मायदेशात रसायनशास्त्रातलं संशोधन समृद्ध करण्याच्या निर्धारानेच. आपल्या विषयातील नवी नवी क्षितिजे धुंडाळताना त्यांनी स्वतःला झोकून दिले ते नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. विविध नॅनोमटेरिअलचे संशोधन करताना त्याचे व्यावहारिक फायदे भारताला मिळायला हवेत, यासाठी राव अत्यंत जागरूक असतात. अशा या नॅनोतंत्रज्ञान आणि रसायनशास्त्रातील जागतिक कीर्तीच्या देशभक्त वैज्ञानिकाची स्फूर्तिदायक चरित्रगाथा