Description
डॉ. पठाण यांच्या संभाजी चरित्राचे वैशिष्ट्य काय?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला
तेव्हा आमच्या लक्षात आले की,
एका धर्मनिरपेक्षवादी मुस्लीम लेखकाने
लिहिलेले हे महाराष्ट्रातील पहिले संभाजी चरित्र आहे.
आज समाजातील काही विशिष्ट गट
संभाजी महाराजांनी दिलेल्या लढ्यास हिंदू विरुद्ध मुस्लीम
असा रंग देऊन तो धार्मिक लढा होता,
असे भासवून या राजास ‘धर्मवीर' म्हणून घोषित करीतअसताना
या ग्रंथाने या घोषणेला छेद दिला आहे.
औरंगजेबाने सुरु केलेले हे युद्ध
खऱ्या अर्थाने साम्राज्यवादी होते व त्याला विरोध करून
त्याच्याशी लढणाऱ्या मराठ्यांचे युद्ध हे त्याच अर्थाने स्वातंत्र्यवादी होते.
इथे हिंदू विरुद्ध मुस्लीम असा धर्माचा काही प्रश्नच निर्माण होत नाही,
हे ऐतिहासिक सत्य डॉ. पठाण यांच्या या ग्रंथातून दृग्गोचर होते आहे आणि
हेच सत्यकथन या ग्रंथाचे यश आहे असे आम्हांस वाटते.
- डॉ. जयसिंगराव पवार
ज्येष्ठ इतिहासकार
Chhatrapati Sambhaji Maharaj | Dr. Ismail Pathan
छत्रपती संभाजी महाराज । डॉ. इस्माईल पठाण