Description
डॉ नीलिमा गुंडी यांचा देठ जगण्याचा हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे हे लेखन आठवणी, अनुभव,वाचन आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकीकडे आत्मपर लेखनातील काव्यात्मता जपते आणि त्याचवेळी भोवतालच्या विश्वाशी कधी सौहार्दपूर्ण नाते राखते, तर कधी मिश्कीलपणे बदलांना सामोरे जाते. संवेदना, भावना आणि चिंतन यांची एकात्म गुंफण साधत आकाराला आलेले यातील लेख अर्थपूर्ण शब्दांच्या आधारे जगण्याचा देठ तोलून धरण्यात यशस्वी ठरतात व्यक्तिगत भावानुभवांइतकेच निसर्ग, बालमन आणि भाषा-संस्कृती हे देखील लेखिकेचे आस्थाविषय असल्यामुळे यातील सर्वच लेख वाचकांशी संवाद साधू शकतील, असे आहेत आशयानुरुप बदलणारी यातील भाषाशैली हा या पुस्तकाचा एक लोभस विशेष आहे.