Description
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. ‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. ‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र, गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी ! अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दिलीप माजगावकरांची स्वतःची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं. अंतरीचे उमटे बाहेरी व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी