Description
दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! * इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थकत नाही, जोमानं पुâलत राहते. जाड वेली, शेंडे, तुरे, गोफारे वागवत वाढत असते. तिला लाल पुâलं अन् गोल अंडाकृती फळं असतात. सर्वांना सावली देते. * भर उन्हाळ्यात ओढ्याकाठी शेळ्यामेंढ्या या दौशाड्याच्या सावलीत उभ्या राहतात आणि तिचा पाला खाऊन गुजराण करतात. अशी ही अडचणीतून वाट काढणारी वनस्पती. तिचं शास्त्रीय नाव Combretum-albidum-G.Don. * प्रत्येक भागात तिची वेगवेगळी नावं - जसं दवशिरा, पिळुकी. आमच्या भागात तिला म्हणतात ‘दौशाड'. ती सांगत असते, ‘कितीही अडचणी, वाईट प्रसंग आले; तरी डरायचं नाही.’ तिचाच आदर्श आम्ही घेतला.