Description
अशी एक म्हण आहे की, 'कौशल्ये शिकवता येतात, पण संकल्पना मात्र स्वतःच समजून घ्याव्या लागतात.'
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाहीत. त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमांतून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातून ते गणित शिकतात. या पुस्तकात गणितज्ज्ञांच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समज पक्की होईल.