Description
GST - वस्तू - सेवा - कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त? 'माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का?' 'माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची? आणि किती?' 'मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार?' 'माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार?' 'छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या?' • बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत • डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत • मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत • नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत • घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत • लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत • उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर परिणाम घडवणाऱ्या GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे सोपे विवरण करणारे GST - सर्वांसाठी