Description
इंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दोNयाच्या गाठी मारून संदेश पाठवणारी, शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी. पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वषांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली. पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे ‘गुप्त’ शहर सापडले - ‘माचूपिच्चू’ ! अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले, ‘इंका’चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला, सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले, त्याचीच ही कहाणी.