Description
इतिहास म्हटलं की आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांची झुंज, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी घेतलेल्या गरुड भराऱ्या. हा इतिहास कायमच प्रेरणा देणारा ठरला आहे. आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाच्या शौर्य गाथेचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न काही तरुण इतिहास अभ्यासकांनी अस्सल साधने, बखरी, ऐतिहासिक दस्तावेज, संदर्भ ग्रंथ, शकावल्या, मोडी पत्र या आधारे केला आहे. मराठी सत्तेचा उदय ते मराठी फौजांची खैबरखिंडीपर्यंत धडक, अटकेपार रोवलेले झेंडे हा दैदिप्यमान प्रवास या पुस्तकात अभ्यासपूर्ण लेखांमधून मांडला आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पराक्रमांच्या घटनांनी सजलेला हा लेख संग्रह म्हणजेच इतिहासाच्या पाऊलखुणा..!