Description
मध्य भारतातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाचं सुप्रसिद्ध जंगल माहित नाही असा निसर्गप्रेमी सापडणं अवघडच! अप्रतिम निसर्गसौंदर्य, वाघ व वन्यप्राण्यांची रेलचेल असलेलं हे अरण्य बाराशिंगा या दुर्मिळ हरीणांचं पृथ्वीतलावरील एकमेव घर आहे. कान्हातील वन्यजीवनाचं बारकाईने निरीक्षण आणि अभ्यास करताना लेखक अतुल धामणकरांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या याच ' अरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना ' या पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. जंगलात नित्य घडणाऱ्या अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव या पुस्तकाव्दारे वाचकांना चार भिंतींत बसूनही घेता येणार आहे.

