Description
हिमांशुंच्या कवितेत, पळसपानांचे द्रोण, प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं जशी येतात तसंच सलाइन आणि स्कॉचच्या बाटल्या येतात, इन्फ्रारेड डोळे येतात आणि सेपीया रंग येतात. अर्मानीसारख्या उंची, अभिनव सुगंधाचा उल्लेख येतो आणि केसांचा नायगारा येतो. ह्या सगळयांना संदर्भ असतो कवीच्या एका वेगळ्याच उत्कट, जिवंत अनुभवाचा. मला ह्या कविता फार आवडल्या म्हणून कौतुकाचे, आशीर्वादाचे हे चार शब्द लिहिले, इतकंच.