Description
कावळे आणि माणसं...
एक जमिनीवरून चालणारा आणि
हवेत उडणारा पक्षी तर
दुसरा जमिनीवरून चालणारा आणि
कल्पनेचे पंख घेऊन उडणारा...
दोघांचं भौतिक जग
भिन्न वाटत असलं तरी
मानसिक जग जवळपास जाणारं...
काही वेळा कावळे
माणसासारखं वागतात तर
माणसं कावळ्यासारखं...
कावळा माणसाचा बाप बनतो
पण माणूस कावळ्याचा बाप नाही बनत...
ज्या माणसाच्या सहवासात कावळा राहतो
त्याचे गुण-दुर्गुण उचलतो...
कधी कधी कावळा
माणसापेक्षा शहाणा होतो
तर कधी कधी असहाय्य माणूस
कावळ्यासमोर हात जोडतो...
कावळे, माणसं आणि स्मशान
यांना शब्दात पकडण्याचा
हा एक प्रयत्न...

