Description
तरुण मित्र-मैत्रिणींनो, आपलं करिअर विज्ञान-संशोधनात करायचं ठरवताय? कोणते मार्ग अनुसराल? कोणते आनंद अन् निराशा तुमच्या वाटयाला येऊ शकतील? हे करिअर तुम्ही का निवडायला हवं? यश मिळवण्यासाठी काय करायला हवं? 'मुंग्या' या विषयावर अत्यंत मूलभूत संशोधन करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ : डॉ. एडवर्ड ओ. विल्सन या प्रतिभावान शास्त्रज्ञानं स्वत:च्या जीवनातील घटना, आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे मित्राच्या जिव्हाळयानं तरुणाईशी साधलेला संवाद म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन.