Skip to product information
1 of 1

Magic School By डॉ. अभय बंग

Magic School By डॉ. अभय बंग

गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले. ‘नई तालीम’ला शासकीय मान्यता नसल्याने ती देखील प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या स्पर्धेत टिकू शकली नाही. शासकीय मान्यता नसल्याने या...

Regular price Rs. 50.00
Sale price Rs. 50.00 Regular price Rs. 50.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 50.00
View full details

गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले. ‘नई तालीम’ला शासकीय मान्यता नसल्याने ती देखील प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या स्पर्धेत टिकू शकली नाही. शासकीय मान्यता नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्याला पुढे शैक्षणिक भवितव्य नसे. त्यामुळे पालक या शाळेत आपली मुले पाठवू इच्छित नसत. भूदान-ग्रामदान चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलामुलींना या शिक्षणपद्धतीत पाठवले पण एका विशिष्ट काळानंतर परत काढून घेतले. समाज व शासन या शिक्षणाला मोजत नव्हते. हा न्यूनगंड येथील विद्यार्थ्यांनाही सतत खात होता. कोणत्याही परिवर्तनाचे बेट आजूबाजूच्या विरोधी वातावरणात फार काळ टिकून राहू शकत नाही. समाजाच्या स्वार्थाच्या व स्पर्धांच्या लाटांनी एक दिवस शिक्षणाचे हे अद्भुत बेट गिळून टाकले. माझ्या शाळेचे हे वर्णन आज सांगतो तेव्हा अनेकजण विचारतात, आता आहे का ती शाळा? आम्ही आमच्या मुलांना पाठवू. माझ्या मुलांना मी त्या बेटावर पाठवू इच्छितो. पण ते जादुभरे बेट आता कुठे आहे? - डॉ. अभय बंग