Description
वर्गीस कुरियन या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. ‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली. ‘धवलक्रांती’च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही!