Description
ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार! कशी आहे ही आपली पृथ्वी? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान