Description
युरोपच्या टूर्स आखणा-या अनेक प्रवासी कंपन्या गेली काही वर्षे भारतभर आढळतात. परंतु त्या टूर्समध्ये स्वत:च्या खास आवडीनिवडींना मुरड घालावीच लागते. युरेलचे ठरावीक मुदतीचे पास काढून वेळापत्रक पाहून व इंटरनेटची मदत घेऊन कमी दरात, स्वत:च्या आवडीनुसार युरोपचा प्रवास करणे सहज शक्य आहे, हे अनेकांना माहीतच नसते. ती माहिती मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी ‘युरोपचा प्रवास’ हे पुस्तक लिहिले आहे. युरेल पास, व्हिसा, पासपोर्ट, परकीय चलन, कस्टम्स, विमा यांच्या कायदेशीर बाबींबरोबरच नित्याच्या व्यवहारात लागणा-या बारीकसारीक खाचाखोचा, कुठे काय पाहावे, कुठे राहावे इत्यादी बारकावे यात दिले आहेत. याशिवाय लेखकांनी स्वत: प्रवास केलेला असल्यामुळे स्वानुभवांचे कवडसे जागोजागी दिसतातच. हे पुस्तक वाचून युरोपच्या प्रवासाच्या तयारीला लागावेच असे वाटेल.