Description
इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुद्ध बंडखोरी करणारी मनस्विनी. स्वतःच्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच ! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुद्ध जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुद्धिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वतःचं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणा-या या दोघींना बांधणा-या सहानुभावाच्या धाग्यातून अनुवादलेलं आत्मचरित्र मी इझाडोरा