इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था 'मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली 'सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात...
इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था 'मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली 'सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात आणि या संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक, अत्यंत गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देतात. यातील सगळ्या कारवाया खर्याखुर्या घडलेल्या आहेत. यातील कथा अत्यंत वेगवान, चपळ, हालचालींनी काठोकाठ ओसंडून वाहणार्या 'अशक्य' अशा आहेत.