Description
जगात कुठेही मानवजात संकटात सापडली, की धावून जायचं, हा मदर तेरेसांचा सहज धर्म ; मग तो बांगलादेशचा महापूर असो, ग्वाटेमालातला भूकंप असो किंवा इथियोपियातला दुष्काळ असो. आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या सगळ्या जागी जाताना त्यांना आठवत असे, ती स्वत:ची जन्मभूमी अल्बानिया. आपल्या देशाच्या झालेल्या चिंध्या पाहून त्यांना क्लेश होत. त्या म्हणत, “एक शेवटची इच्छा आहे, माझ्या जन्मभूमीत जाऊन कार्य करण्याची. तिथे माझी आज फार गरज आहे.” कशी होती त्यांची जन्मभूमी ? त्यांचं बालपण ? त्यांच्या बालपणापासून ते ‘मदर’पर्यंतच्या प्रवासाची ही धावती ओळख.