Description
'नादवेध ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून गान-रसिकांपुढे उभी केलेली अक्षर-मैफल आहे. ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती, अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी बनला आहे. नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली, आठवणी आणि किस्से... हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा अनुरागी श्रोता बनून जातो.