Description
'एसीएन नंबियार... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातले हे एक महत्त्वाचे, पण फारसे कुणाला माहीत नसणारे व्यक्तिमत्त्व! ‘इंडियन इंडिपेंडन्स लीगची युरोपातील तटबंदी सांभाळण्याची जबाबदारी सुभाषबाबूंनी ज्यांच्यावर सोपवली, ते एसीएन नंबियार... १९४७ पूर्वी आणि नंतरही पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे विश्वासू, राजनैतिक सल्लागार होते, ते एसीएन नंबियार... एखाद्या वडीलधाऱ्या कुटुंबीयाप्रमाणे इंदिरा गांधी ज्या ‘नानूंची काळजी घेत, त्यांना छोटीमोठी पत्रे पाठवत, ते एसीएन नंबियार... आजवर फारशा प्रकाशझोतात न आलेल्या एका गूढ व्यक्तिमत्त्वाचा परिचय घडवणारे आगळे पुस्तक. '