Description
'काही बोलायाचे आहे... पण बोलणार नाही... ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही, आज अनेकांची भावना आहे. बोलण्यात अर्थ नाही, बोलून उपयोग नाही, बोललं तरी ऐकणार कोण?, बोलून थोडंच सुधारणार आहे? वगैरे वगैरे... या सगळया शंकाकुशंका दूर ठेवत, समकालीन कुटुंब-जीवन, समाजजीवनातल्या कळीच्या प्रश्नांबद्दल काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न. वाचकाच्या चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं, विचार करायला लावणारं ...पण बोलणार आहे!