Description
डॉ. अरुण जोशी हे एक नामवंत पशुवैद्य. घरातल्या कुत्र्यामांजरांपासून सर्कशीतल्या हत्तीघोडयांपर्यंत, गोठयातल्या गायीम्हशींपासून रानावनातल्या वाघसिंहांपर्यंत, पिंजऱ्यातल्या पोपटमैनेपासून घरटयातल्या गिधाडघुबडापर्यंत, अजस्र देवमाशापासून खेळकर डॉल्फिनपर्यंत असंख्य पशुपक्ष्यांच्या सहवासात ते वावरले. आयुष्यभर अनेक प्राण्यांची काळजी घेणाऱ्या, देखभाल करणाऱ्या अन् त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, या प्राण्यांची स्वभाववैशिष्टये बारकाईने निरखणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्राणिसख्याच्या रंजक आठवणी.