Description
पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान... पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे... श्रीनिवास विनायक कुलकर्णी