Description
'ख्रिस्तवासी पोप दुसरे जॉन पॉल यांचे आयुष्य म्हणजे असंख्य नाटयपूर्ण घटनांची मालिकाच! या कॅथलिक धर्माचार्यांच्या पोलंडमधील पूर्वायुष्यासह व्हॅटिकनमधील प्रदीर्घ प्रभावी कारकिर्दीचा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या पुस्तकात सविस्तर आढावा घेतला आहे आणि त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या असंख्य मानवी पैलूंवरही प्रकाशझोत टाकला आहे.